मुंबई: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल सुरूच आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी रेसकोर्सच्या जागेवरून ट्वीट करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय! समजलेल्या माहितीप्रमाणे वरळी डेअरी बिल्डर्सच्या घश्यात घालण्यासोबतच रेसकोर्सची जागाही व्यावसायिक हितसंबंधांसाठी देण्याचा प्रयत्न सुरु आहे, ही मुंबईकरांच्या हक्काची विनामूल्य असणारी जागा आता खोके सरकार व्यावसायिक हितसंबंध असणाऱ्यांच्या घश्यात घालू पाहतंय! पण आम्ही ते होऊ देणार नाही! मुंबईकरांच्या हक्काची इंच इंच जमीन मुंबईकरांसाठीच वापरली जावी ह्यासाठी आम्ही लढत राहू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान,यावर आता शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे सर्वांत महत्वाचे ठरणार आहे.