मुंबई: टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांवरुन बऱ्याच जणांनी सुनावले आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लिलता पसरवल्याच्या आरोपाखाली उर्फीविरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता उर्फी जावेदने पु्न्हा एकदा चित्रा वाघ यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे.
उर्फी जावेद हिने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन चित्रा वाघ यांना डिवचत एक ट्वीट केले आहे. उर्फी ट्वीटमध्ये म्हणते, “मेरी DP इतनी ढासू, चित्रा वाघ मेरी सासू” असं म्हटलं आहे.

दरम्यान, उर्फीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून नेटकरी तिच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणतो, हे तर लव्ह जिहाद झालं. दुसरा नेटकरी म्हणतो, अजून आपली खिल्ली उडवण्याचं बाकी आहे. आणखी एक नेटकरी म्हणतो, उर्फी इतनी ढासू, चित्रा वाघके निकले आसूँ. तर आणखी एक नेटकरी म्हणतोय, सासू बाई कोमात, सून बाई जोमात अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्फीच्या पोस्टवर आपले मत मांडले आहे.