नाशिक: नाशिकमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
“संजय राऊत म्हणतात मी जे गेले त्यांना ओळखत नाही. पण तुम्हाला सांगतो. माझ्या वडिलांच्या नावावर शिवसेना कार्यालय आहे. या मध्यवर्ती कार्यालयावर आम्ही दावा करणार आहोत, असा इशाराच रुपेश पालकर यांनी दिला. तर, राऊत फक्त हिशोब घ्यायला नाशिकला येतात”, असा आरोप प्रवीण तिदमे यांनी केला आहे.

तसेच, संजय राऊत हे शरद पवारांकडे जाऊन शिवसेना संपवण्याचं काम करत आहेत. संजय राऊत तुडवा तुडवी काय असते हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. कुठे यायचं ते सांगा. आम्ही पालापाचोळा आहोत का ते दिसून येईल, असं आव्हानच शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी दिले.