मुंबई: उद्या राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, सत्तेत असलेले शिंदे- फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले,“मोठ्या अपेक्षेने सुप्रीम कोर्टाकडे पाहिलं जातं, महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार असून आमचा न्यायालयावर विश्वास असून मोठ्या अपेक्षेने सुप्रीम कोर्टाकडे पाहिले जाते,” असा विश्वास संजय राऊत व्यक्त केला आहे.

तसेच, “राज्यात राज्याच्या राजकारणात द्वेष, सूडाचे राजकारण पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे राजकारण गेल्या 40 वर्षात झालं नव्हते असे म्हणत राजकीय मतभेद होतात परंतु कटूता संपवायला फडणवीस पुढे येणार असतील तर महाराष्ट्र स्वागत करेल,” असेही वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.