सोलापूर: मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबता थांबताना दिसत नाही. उर्फीने तोकडे कपडे का घालते? याचं कारण सांगितलं. पूर्ण कपडे घातल्याने आपल्याला ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं तिने म्हटलं होतं. त्यासाठी तिने फोटोही शेअर केले होते. मात्र, त्यावरून चित्रा वाघ यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उर्फीला फटकारले.
चित्र वाघ म्हणाल्या, “व्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही. फॅशन व नांगनाच यात फरक आहे. ऐकलं तर ठीक. नाही तर आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, असा इशारा देतानाच नागडी उगडी फिरते तिच्यावर कारवाई नाही. मात्र मला नोटीस पाठवली गेली, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

दरम्यान, एका आईने मला एसएमस पाठवला होता. त्यामुळे मी उर्फी विषयावर बोलले. मुली कोणाचा आदर्श घेणार? महाराष्ट्रात हे चालणार नाही. आधी कपडे घाला. मग ठरवा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.