मुंबई:मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, “महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेंदू गुडघ्यात आहे. महाविकास आघाडीचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत तर त्यांचा मेंदू गुडघ्यात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं की, एक किंवा दोन उद्योग राज्याबाहेर गेले तर राज्याला फरक पडत नाही. फक्त गुजरातकडे का जातात हे योग्य नाही, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

तसेच, कोरोनाकाळातील टेंडरबाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी ते म्हणाले, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल खोटं बोलत आहेत. आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित लोकांना काम कशी मिळाली? इक्बालसिंह चहल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कामं केली जात होती, असा आरोप देशपांडेनी केला आहे.