Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, सोमवार ९ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 1,087

मेष:-
भाग्याची साथ लाभेल. व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल. आर्थिक घडी सुधारेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. एखादी दिलासादायक घटना घडेल.

 

 

वृषभ:-
तब्येतीला जपा. जवळचे मित्र भेटतील. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक प्रसन्नता लाभेल. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल.

Manganga

 

मिथुन:-
वेळेबरोबर चालावे लागेल. मनासारखी घटना घडेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर रहा.

 

कर्क:-
करियर विषयी चिंता वाटू लागेल. आवश्यक तेथेच पुढारीपणा स्वीकारावा. आपल्याच विचारात मग्न राहाल. गणेशाची आराधना करावी. हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा.

 

सिंह:-
कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. मुलांकडून चांगली बातमी समजेल. प्रयत्नांची कास सोडू नये. हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यवसायिकांनी सतर्क राहावे.

 

कन्या:-
मात्र धावपळ लाभदायक ठरेल. कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस.

 

तूळ:-
मानसिक दुर्बलता टाळावी. मुद्यावर अडून राहाल. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे. मनातील संभ्रम दूर सारावा. उगाचच एखादी चिंता सातवेल.

 

वृश्चिक:-
उगाच लपवा छपवी करू नका. गरज नसेल तर फार बोलू नका. बौद्धिक ताण जाणवेल. सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल.

 

धनू:-
धार्मिक कामासाठी खर्च कराल. कौटुंबिक जबाबदार्‍या चिकाटीने पार पाडाव्यात. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जुनी येणी प्राप्त होतील. जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात.

 

मकर:-
जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. कामावर अधिक निष्ठा ठेवावी. मित्रांसोबत वेळ घालवाल. कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल.

 

कुंभ:-
समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. समोरील संधीचा लाभ घ्यावा. वेळेचा सदुपयोग करावा.

 

मीन:-
अनावश्यक खरेदी केली जाईल. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे. आहारात अति तिखट पदार्थ टाळावेत. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. वादाच्या मुद्यात अडकू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!