Latest Marathi News

BREAKING NEWS

 

‘….तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य नाही’: ‘या’ महिला नेत्याचे मोठे विधान!

0 257

नाशिक: विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन मिळावे यासाठी नाशिकच्या व्ही प्रोफेशनल्स या संस्थेतर्फे आज आरोग्य विज्ञान विद्यापीठात करिअरबाबत मार्गदर्शनासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी सहभाग घेतला. याच कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत घेण्यात आली.

 

 

यावेळी पंकज मुंडे म्हणाल्या, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा मी आमदार झाल्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी माझी मुलाखत घेतली होती. तेव्हा मी उत्तर दिलं होतं की, ज्या निमित्ताने मी राजकारणात आले, ते करण्यासाठी माझ्या मनात अमुक-अमुक विचार आहे, त्यामुळे ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आलेय. त्या गोष्टी समाजासाठी करण्याची जर मला मुभा नसेल, तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य नाही”, असे स्पष्ट विधान पंकजा यांनी केले.

 

दरम्यान, यावेळी पंकजा मुंडे यांना पक्षाकडून विधान परिषद किंवा इतर ठिकाणी का संधी दिली जात नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “याचे उत्तर मी नाही देऊ शकत. मला संधी न देणारे याचे उत्तर देऊ शकतील”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.