मुंबई: चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार वक्तव्यानंतर कुठे लपून बसले होते, असा खोचक सवाल केला होता, यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवार म्हणाले, ‘अधिवेशन शुक्रवारी संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शनिवारी मुंबईला आलो. रविवारी नूतनवर्ष होतं. त्यानंतर २ जानेवारीपासून पुन्हा कामाला लागलो. कुठेही गेलो नव्हतो. कुणी अशी टीका केल्यानंतर आपल्यालाही कळलं पाहिजे. त्यात तथ्य आहे का, तपासलं पाहिजे. अजित पवार घाबरून बसणारा नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, ,’अजित पवार यांना उठसूठ लोकांना टपली मारण्याचा दिला नाही. लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे. एखाद्या गोष्टीवर किती मोठी प्रतिक्रिया येते, याचा अनुभव अजित पवार यांना आला आहे. अजित पवार कुणाला घाबरत नाही तर चार दिवस कुठे लपून बसले होते, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.