पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य ताजं असतानाच कोश्यारी यांनी काल पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाष्य केलंय. व त्यावर आता चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “शरद पवार यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एक वाक्यता नसते. शरद पवार बोलतात एक अन् करतात एक, असे ते म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवारांना लोकांना हसवणारं बोलणं याची सवय लागली आहे. वाद निर्माण होतो पण असं होऊ नये, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.