मुंबई :आलिया – रणबीरला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केलं जातं. पण आता एका मिटिंगहून परतत असताना रणबीरला स्पॉट करण्यात आलं. यावेळी फोटोग्राफर्सची नजर रणबीरच्या फोन वॉलपेपरवर गेली. अभिनेत्याच्या वॉलपेपरवर पत्नी आलिया आणि लेक राहा यांचा फोटो नसून वडील ऋषी कपूर यांचा फोटो आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, रणबीरच्या फोन वॉलपेपरवर ऋषी कपूर यांचा एक खास फोटो आहे. फोटोमध्ये ऋषी कपूर यांच्या हातात एक ग्लास दिसत असून ते प्रचंड आनंदी दिसत आहेत. ऋषी कपूर यांनी २०२० मध्ये अखेरच्या श्वास घेतला. कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कपूर कुटुंबासह बॉलिवूडला मोठा धक्का बसला.
दरम्यान, सध्या रणबीरच्या फोन वॉलपेपरचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.