Latest Marathi News

BREAKING NEWS

 

“….मात्र महिला आयोग अध्यक्षपदी बसलेली व्यक्ती चुकीची” ; चित्रा वाघ!

0 197

सोलापूर : उर्फी जावेद हिच्या ड्रेसिंग स्टाईलवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात वाद निर्माण झालाय. त्यावर आज सोलापुरात पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांवर घणाघात केला आहे.

 

 

यावेळी चित्र वाघ म्हणाल्या, “फक्त अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाहीत. तर महिला आयोगाला सदस्य असतात. एवढंच नव्हे तर राज्याचे पोलीस संचालकही महिला आयोगाचे सदस्य असतात. त्यामुळे चाकणकरांनी कुणाशी बोलून नोटीस पाठवलीय की आपली आपण पाठवली हे प्रश्न अनुत्तरित आहेत. येत्या दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने सगळ्या गोष्टी समोर आणू, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

 

 

दरम्यान , आमचा महिला आयोगावर आक्षेप नाही. मात्र अध्यक्षपदी बसलेली व्यक्ती चुकीची असली तर महिला आयोगावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे महिला आयोगाने मला पाठवलेल्या नोटीशीचं मी उत्तर दिले आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.