पिंपरी-चिंचवड : माझी 2014 ची भाषणं काढून बघा. तेव्हा मी म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांकडे विशेष लक्ष द्यावं, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
तसेच, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांच्यासाठी समान असलं पाहिजे. आपण स्वत: गुजराती आहोत. त्यामुळे गुजरातला प्राधान्य देणं हे एका पंतप्रधानाला शोभत नाही”, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. अशात मनसे भाजपच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. ते पिंपरी चिंचवडमधील जागतिक मराठी संमेलनात बोलत होते.