अमरावती: सावत्र बापाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना वरूड तालुक्यात घडली. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास वरूड पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीविरूध्द बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून, त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

तक्रारीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची ३५ वर्षीय आई तिच्या मोठ्या मुलीच्या अर्थात पिडिताच्या मोठ्या बहिणीच्या प्रसुतीसाठी बाहेरगावी गेली होती. तर पिडिता ही सावत्र बापाच्या घरी एकटीच होती. दरम्यान, १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ च्या सुमारास ती मुलगी घरातील कामे आटोपून हॉलमध्ये बसली असताना आरोपी सावत्र बाप तेथे आला.
अखेर तिने ७ जानेवारी रोजी सायंकाळी वरूड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिची आपबिती ऐकून तक्रार दाखल करवून घेतली. वरूड पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवत आरोपीला शनिवारी रात्रीच अटक केली.