पुणे: अठराव्या जागतिक मराठी संमेलन सध्या पुण्यात पार पडत आहे. याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी राज्यात महापुरुषांवर होणाऱ्या अपमानावरही राज ठाकरेंनी जोरदार टीका केली.
राज ठाकरे म्हणाले, “सध्या कोणीही इतिहासकार होत आहे, कोणीही काहीही बोलत आहे. राज्यातील राजकीय स्थिती एवढी लयाला गेली आहे. जातीजातीत तेढं निर्माण करण, महापुरूषांबद्दल बोलणं हे राजकारण नव्हे. राजकारण अगदी मुक्त असलं पाहिजे, दोन द्याव्या तर दोन घ्याव्या,” असा सल्लाही राज ठाकरेंनी यावेळी राजकीय नेत्यांना दिला.
दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या लाव रे व्हिडिओवर ही खुलासा केला. २०१४ नंतर ज्या गोष्टी देशात घडल्या त्यावर टीका म्हणून ती मोहिम होती. मात्र नंतरच्या काळात देशात कलम ३७० रद्द करणे, राममंदिराचा प्रश्न मार्गी लागणे अशा चांगल्या गोष्टी घडल्या, त्यावर कौतुक करायला नको का?” असा सवालही त्यांनी यावेळी केला.