मुंबई: पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि उत्तर प्रदेश निधानसभेचे माजी अध्यक्ष पंडित केशरीनाथ त्रिपाठी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, केशरीनाथ त्रिपाठी ८ डिसेंबर रोजी बाथरूममध्ये पडले होते. यावेळी त्यांच्या हाताला जबर मार लागला होता आणि फ्रॅक्चर झाले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना जास्त प्रमाणात अशक्तपणा जाणवत होता. तसचे शरीरातील ऑक्सिजन देखील कमी जास्त होत होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी ४ वाजता प्रयागराज येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.