Latest Marathi News

BREAKING NEWS

 

शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्यावर टीका

0 73

मुंबई: मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले. रश्मी ठाकरेंनी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केल्यामुळेच उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले, असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला. ते शनिवारी मुंबईत मनसेच्या सभेत बोलत होते.

 

ही आघाडी तयार करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील नारद शरद पवार, झाकणझुले संजय राऊत यांचा समावेश होता. सत्तेशिवाय यांना करमत नाही. त्यामुळे या जोडगोळीने मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंना पटवण्यासाठी एक काम केलं आणि उद्धव ठाकरेंच्या घरी सैरंध्रीने केस मोकळे सोडले.”

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि कारभार सुरू झाला. मुळात ‘औकात’ नसलेल्या माणसाला गादीवर बसवण्यात आले. त्यांचं आजारपणही खरं होतं की खोटं माहिती नाही, पण कारभार त्यांच्या पत्नीला करायचा होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आजारी पाडण्यात आले. असा आरोप प्रकाश महाजन यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.