कोल्हापूर: राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीयवाद निर्माण झाला आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या आरोपावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, “राज ठाकरे काही आरोप करू शकतात. राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष कोण होते त्याची यादी पाहा. भुजबळ होते. पिचड होते. अनेक लोकं होते. ते कोणत्या समाजाचे होते सर्वांना माहीत आहे. ती नावे सांगायची गरज नाही, जातीचा विषय आमच्या मनात येत नाही. आम्ही सर्व शाहू फुले आंबेडकरी विचाराचे लोक आहोत. त्यामुळे कोणी काही टीका केली तर आम्ही त्याची दखल घेत नाही, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार हे कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.