Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, रविवार ८ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 612

मेष:-
गरजूंना मदत कराल. तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला.

 

 

वृषभ:-
अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे . कौटुंबिक वादात पडू नका. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे. कोणतेही वचन देताना सावध रहा.

Manganga

 

मिथुन:-
व्यवसईकांनी संधीचा लाभ घ्यावा. आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या.

 

कर्क:-
आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. वरिष्ठांना खुश कराल. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. दिवस कलासक्त असेल. मित्रांविषयि गैरसमज होऊ शकतात.

 

सिंह:-
पायाची दुखणी संभवतात. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी.

 

कन्या:-
बोलतांना सांभाळून शब्द वापरा. व्यवसायिकांना लाभदायक दिवस. नातेवाईकांना नाराज करू नका. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल.

 

तूळ:-
कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. आपल्याच मतावर अडून राहाल. कामाची धांदल राहील. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका.

वृश्चिक:-
पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

 

धनू:-
वैचारिक स्थिरता ठेवावी. जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. नियमांना तडा जाऊ देऊ नका. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी.

 

मकर:-
जुन्या गोष्टी आठवत बसू नका. लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चारचौघात कौतुक होईल. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

 

कुंभ:-
नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. भागीदारीत फार विसंबून राहू नका. सरकारी योजनांचा लाभ घ्या. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल.

 

मीन:-
आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. व्यावसायिक विकास शक्य होईल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!