मुंबई : शिंदे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विनायक राऊत म्हणाले, “नारायण राणे हे स्वार्थी आणि सत्तालंपट आहेत. अशा माणसाच्या वक्तव्याकडं आम्ही फारसं गांभीर्यानं घेत नाही. केवळ सत्तेसाठी त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली. काँग्रेसशी बेईमानी केली. आता देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घालून मोकळा झाला आहे. नरेंद्र मोदी यांना शिव्या घालून मोकळा झालाय. अशी टीकाही विनायक राऊत यांनी केली.

तसेच ते म्हणाले, “नारायण राणे आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची. त्यांनी स्वताच्या अस्तित्वाची काळजी घ्यावी. शिवसेनेबद्दल काळजी घेण्याचं कारण नाही. मंत्रीपद चार महिने टिकते की, नाही याची काळजी घ्यावी, असंही विनायक राऊत म्हणाले.