मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.
विद्या चव्हाण म्हणाल्या, महागाई आधी कमी करा मग बोला. दीड फुटाचा आमदार असतो, त्याची जीभ दीड फुटाची झाली. तो इतकं बोलतो की अजित पवार यांच्यावर टीका करतो. टीका करण्याआधी तुमच्या सरकारमध्ये, तुम्ही ज्या मतदारसंघात आहात त्या लोकांचे प्रश्न मांडाना. महागाई तुमच्या मतदारसंघाच्या लोकांना नाहीय का?”, असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला.

तसेच, “लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं. कधी भगवा आणायचा तर कधी काही आणायचं. आम्हीपण हिंदू आहोत. आम्हीसुद्धा पूजा केल्याशिवाय घरातून बाहेर निघत नाहीत”, असं विद्या चव्हाण म्हणाल्या.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नितेश राणे यांना ‘टिल्ल्या’ असं म्हणत खिजवलं होतं. त्यानंतर नितेश राणे यांनी ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता विद्या चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय.