मुंबई:उर्फी जावेद प्रकरणावरुन आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. उर्फी जावेद प्रकरणात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यावर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा अपमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांनाच नोटीस पाठवली होती.या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “माझा आक्षेप हा महिला आयोगावर नसून महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आहे, अध्यक्षा म्हणजे संपूर्ण महिला आयोग नसतो. मला पाठवलेली नोटीस सर्व सदस्यांच्या सहमतीने पाठवली आहे का? असा सवाल त्यांनी रुपाली चाकणकरांना विचारला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्ही नंगा नाच चालू देणार नाही, तसेच रुपाली चाकणकरांनी कपड्याच्या तुकड्यावर बोलत आहे, कपड्यावर नाही,असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
तसेच त्या पुढे म्हणाल्या,”उर्फी ला जर जास्त कपड्याची एलर्जी आहे, तर आपल्याकडे औषधं आहेत, असे म्हणत उर्फीचं थोबाड फोडण्यापूर्वी एकदा तिला साडी चोळी देऊ, साडी चोळी देऊन ऐकलं नाहीतर तिचं थोबाड फोडू,” असा इशाराही दिला.