मुंबई: नारायण राणेंनी केलेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी देखील तिखट शब्दांमध्ये ‘माझ्या नादाला लागू नका. राजवस्त्र उतरवून या,’, असे म्हणत पलटवार केला होता. आज पुन्हा एकदा नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, शिवसेनेच्या 19 जून 1966 पासून पहिल्या 40 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली नाही. ती संजय राऊतने घेतलेली आहे. आज त्याला शिवसेना संपवल्याचा आनंद होत आहे. 56 आमदार होते आता 12 पण राहिलेले नाही. संजय राऊतचे एकतरी विकासात्मक काम सांगा. संपादक म्हणून त्यांनी लिहिलेला एकतरी बौद्धीक लेख दाखवा, असे ते म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, एक दिवस मी उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. मी खासदार असताना संसदेत संजय राऊत माझ्या बाजूला बसून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल काय काय बोलायचा ते मी त्यांना सांगणार आहे. त्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या ऐकून उद्धव आणि रश्मी ठाकरे संजय राऊतला चपलेने मारले नाहीतर मला सांगा. संजय राऊत मातोश्रीला सुरुंग लावणारा विष असल्याची टीका राणे यांनी केली.