मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारला 6 महिने झालेत. या 6 महिन्यांत एकदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला. दरम्यान, आता राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तार 20 ते 22 जानेवारीदरम्यान होणार असल्याचे शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.
संजय शिरसाट म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मी याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी काही तांत्रिक अडचणींमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे सांगितले. या अडचणी 15 तारखेपर्यंत दूर होतील. त्यानंतर 20-22 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असा अंदाज आहे,’ असे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावरही टीका केली. ते म्हणाले की, ‘येत्या काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे रिकामी होईल. शिवसेनेचे उर्वरित आमदार पुढील 8-10 दिवसांत शिंदे गटात सहभागी होतील.