नाशिकः राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेचा खटला कोर्टात सुरु आहे. न्यायव्यवस्थेतवर कोणताही दबाव आला नाही तर निकाल आमच्या बाजूने लागणार. आणि न्यायालयात आम्हाला न्याय मिळणार, हे निश्चित आहे… त्यामुळे हे सरकार फार काळ टिकाणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो, असा दावा राऊतांनी केला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, “राज्यात 2024ची तयारी सुरू आहे. त्याआधीच परिवर्तन होईल. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. माझं मत पक्कं आहे. आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव येईल असं वाटत नाही. संविधान घटना आणि कायद्याचं उल्लंघन करणारं सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही, 16 आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे वेळकाढू धोरण सुरू आहे. सरकार व्हेंटिलेटरवर आहे. ते काढलं सर्वोच्च न्यायालयाने तर हे राम सुरू होईल. कोणी त्यांच्याबरोबर राहणार नाही, असं वक्तव्य राऊत यांनी केले आहे.