मिरज : सांगलीतील मिरजमध्ये मध्यरात्री दोन वाजता एसटी स्टॅन्डजवळ पाडकाम करण्यात आलं आहे. या पाडकामावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपचे विधान परिषदेतेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत.
“सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आमचे आमदार आहेत. त्यांनी जाहीर करावं की या कृत्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे का? जर खाडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत आलेले दीड-दोन हजार गुंड या सगळ्यांवर योग्य त्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करतो”, असं स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

दरम्यान, “आपली मिरजेत दुकानं पाडण्यात आली आहेत. ते पाडकाम कायदेशीर आहेत”, अशी आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.