मुंबई : उर्फी जावेद बोल्ड राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या या स्टाईलवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. यावरून चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर आमनेसामने आल्या आहेत. या सगळ्या प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “उर्फीच्या कपड्यांवरून महिला-महिलांमध्येच वाद सुरु आहे. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुणी बोललोय का? आम्ही त्यात भाग घेतलाय का? आम्ही तर उलट महिलांना संधी देतोय. पण संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं का राख करायची हे त्यांच्या हातात आहे, अशी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या कपड्यांमुळे राजकारण तापलंय. यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.