Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शनिवार ७ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 1,407

मेष:-
आरोग्याची काळजी घ्यावी. मनाची चलबिचलता जाणवू शकते. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल.

 

 

वृषभ:-
आवडीचे पदार्थ खाल. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. विचारांना अधिक चालना देऊन पहावे.

Manganga

 

मिथुन:-
नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्यां ची मदत मिळेल.

 

कर्क:-
घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. कामातील निर्णय योग्य ठरतील. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल.

 

सिंह:-
मनातील इच्छा पूर्ण होईल. अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. कौटुंबिक वातावरणात रमाल. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात.

 

कन्या:-
कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. काही गोष्टी नरमाईने घ्या. कामाची धांदल उडू शकते. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा.

 

तूळ:-
अहंकाराला खतपाणी घालू नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. मदतीला मागे हटु नका. पित्त विकाराचा त्रास जाणवेल.

 

वृश्चिक:-
मौल्यवान वस्तु जपून ठेवा. क्रोधवृत्तीला आवर घालावी. अति विचार करू नका. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

 

धनू:-
तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. पराक्रमाला वाव आहे. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते.

 

मकर:-
कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. वडीलांचे सहकार्य मिळेल. कमिशन मधून लाभ कमवाल.

 

कुंभ:-
मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. जुगारातून लाभ संभवतो. दिवस खेळीमेळीत जाईल. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.

 

मीन:-
जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. काहीशी मानसिक शांतता लाभेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!