नवी दिल्ली: येत्या जानेवारीअखेर केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एकनाथ शिंदे गटातील 13 पैकी 2 खासदारांना कॅबिनेट आणि राज्यमंत्री बनवण्यात येणार असल्याची चर्चा असल्याचे समोर येत आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मोदी सरकारमध्ये मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे आणि बुलडाणाचे खासदार प्रतापराव जाधव या दोघांना मंत्रिपद मिळू शकतं.

दरम्यान, प्रतापराव जाधव हे 3 वेळा बुलडाण्यातून लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागू शकते. तर राहुल शेवाळे यांना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.(सौ. tv9 मराठी)