“जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस देण्याऐवजी …..”: महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीसावर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल!
मुंबई: ऊर्फी जावेद प्रकरणावरुन महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यावर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा अपमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांनाच नोटीस पाठवली होती.या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांनीरुपाली चाकणकरांना प्रत्युत्तर दिले आहे.
चित्र वाघ म्हणाल्या, “स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर, त्याचबरोबर “जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली, असो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, राज्य महिला आयोगाने चित्रा वाघ यांनाच महिला आयोगाचा अपमान केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे, त्याचबरोबर या नोटीसावर उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.