मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘समृद्धीच्या टक्केवारीतून पक्ष बनत नाही. पक्ष हा रक्त घामातून बनतो. मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे अनेक विषय आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून नेतात. आमचं बिऱ्हाड जर्मनीला गुंतवणूक आणण्यासाठी जातात, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘आज सकाळी मी नारायण राणेंना उत्तर दिल्या पासून त्यांनी माझी ओळख देण बंद केले. हे त्यांच्या प्रकृत्तीसाठी चांगलं. त्यांनी माझी ओळख काढण्याचा प्रयत्न केला, तर माझं नाव संजय राऊत आहे, राणे तुम्ही गुंड, तर मी महागुंड, कुठे येवू, मी कुणालाही घाबरणार नाही. कुठल्याही एजंन्सीला घाबरत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.