पुणे : उर्फी जावेद हीच्या व्हिडिओवरुण चित्रा वाघ या आक्रमक झाल्या होत्या. त्यावर रूपाली चाकणकर यांच्यासह महिला आयोगावर आरोप केला होता. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना महिला आयोगाने नोटिस बजावून दोन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे सांगितलं आहे.
माहितीनुसार, अनेक पालकांनी वेब सिरिजच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या, चित्रा वाघ यांनी चुकीची माहिती दिली, पंडीतला महाराष्ट्राची लेक म्हणून दिली जावेदला दिली नाही, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी ही टिका केली. आम्ही चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना नोटीस मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. महिला आयोगाची अप्रतिष्ठा केली आहे. आयोगाच्या कामकाजाबाबत समाजात अविश्वास निर्माण होईल असं वक्तव्य रूपाली चाकणकर यांनी केले आहे.

दरम्यान, या नोटीसीमध्ये चित्रा वाघ यांनी महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे.