ठाणे : नाशिकमधील ठाकरे गटातील पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांनी बाळसाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यावर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
म्हस्के म्हणाले, “संजय राऊत यांनी जेलच्या बाहेर राहिलेले आमच्यासाठी महत्वाचे आहे. ते जितकं बोलत राहतील, तितके लोक आमच्याकडे येतील, राहिलेली ठाकरे सेना देखील संपवतील. याशिवाय संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची दलाली करून शिवसेना संपवली आहे असा टोला म्हस्के यांनी लावला.

दरम्यान, नाशिकमधील विधानसभा प्रमुख, शहर पदाधिकारी, शाखा पदाधिकारी हे काही मेंढरं नाही, त्यांची ऊब आमच्या पक्षाला मिळाली आहे आणि त्यांची आम्हाला गरज असल्याचंही म्हस्के यांनी म्हंटले आहे.