पुणे: अजित पवार यांचं छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणा. ते धर्मवीर नव्हते. हे विधान द्रोहच असल्याचं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर अजित पवार यांनी थेट फडणवीस यांना खुलं आव्हानच दिलं आहे.
अजित पवार म्हणाले, “त्यावर, माझं विधान द्रोह आहे की नाही याबाबत त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे ना. तुम्हाला जर द्रोह वाटतो तर केसेस दाखल करा, असं आव्हान देतानाच पण ही केस नियमात बसते का? असा चिमटा अजित पवार यांनी फडणवीसांना काढला.
तसेच, जीवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आम्ही द्रोह करणार नाही. आमच्याकडून तसं घडणार नाही. आमच्या दहा पिढ्याही तसं करणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, मी माफी मागावी असं सांगितलं जात आहे. मी असा काय गुन्हा केला? अपशब्दही वापरला नाही. राज्यपाल, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी बेताल वक्तव्य केले. अपशब्द वापरले. जे शब्द वापरायला नको होते ते शब्द सत्ताधाऱ्यांनी वापरले, असे ते म्हणाले.