Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी! ‘या’ प्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट!

0 345

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबईतील शिवडी कोर्टानं अजामिनपात्र वॉरंट जारी केलं आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर राऊत यांनी शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सोमय्या दाम्पत्यानं कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

 

 

माहितीनुसार, खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. यावर सोमय्या यांनी शिवडी कोर्टात धाव घेऊन राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे.

Manganga

 

 

दरम्यान, या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असून, संजय राऊत हे सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहत असल्यानं सोमय्यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला होता. सोमय्यांच्या वकिलांनी वॉरंट जारी करण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. त्यानंतर राऊत यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!