पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत विधान केल्याने भाजपने त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना आज अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
अजित पवार म्हणाले, “पुन्हा हा विषय वाढवायचा नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मी कुठेही अपशब्द वापरलेले नाहीत. मात्र राज्यपालांविरोधात कोणी का बोलत नाही असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, “हा विषय वाढवण्यात अर्थ नाही. कारण नसताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात. हे बरोबर नाही. आम्हाला जी भूमिका मांडायची, ती आम्ही मांडू. जनतेला जी भूमिका पटेल, त्या भूमिकेचं जनता स्वागत करेल, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, पुणे दौऱ्यावर असतांना अजित पवार बोलत होते.