राजेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रथमच वडर समाजाला स्थान
उपसरपंच पदासाठी आम. गोपीचंद पडळकर गटाच्या सौ. सुनीता बाळू माने यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राजेवाडी/देवानंद जावीर : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ. सुनिता माने यांची बिनविरोध निवड झाली.
राजेवाडी ग्रामपंचायतमध्ये सकाळी दहा वाजता लोकनियुक्त सरपंच प्रशांत शिरकांडे व निवडणूक पीठासीन अधिकारी भारत मोरे यांच्या उपस्थितीत उपसरपंच निवडीच्या प्रक्रीयेला सुरुवात झाली. उपसरपंच पदासाठी आम. गोपीचंद पडळकर गटाच्या सौ. सुनीता बाळू माने यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य छाया कृष्णदेव पुजारी, वैभव विष्णू हेगडे, सुनील विष्णू चव्हाण, स्वाती विनोद मोरे, तुकाराम नामदेव हेगडे, वंदना नारायण कोळी, रूपाली बंडू वाघमारे, अनिल ज्योती दुधाने तसेच तानाजी जरग, राहुल पुजारी, गणेश पुजारी, बाळासाहेब पाटील, महेश पाटील, सिद्धेश्वर शिरकांडे, आनंद माने, भीमराव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडीनंतर फटाक्यांची आतिशबाजी व गुलालाची उधळण करून उपसरपंच सुनीता बाळू माने यांचे स्वागत करण्यात आले. राजेवाडी गावचे सुपुत्र सुभाष सातपुते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनिता बाळू माने यांची राजेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.