आटपाडी : खरसुंडीत लम्पीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची पौष यात्रा रद्द
आटपाडी तालुक्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील खिलार जनावरांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असणारी श्री. सिद्धनाथ खरसुंडी यात्रा यावर्षी लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांची यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती आटपाडी बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील खिलार जनावरांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असणारी श्री. सिद्धनाथ खरसुंडी यात्रा यावर्षी लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांची यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती आटपाडी बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत बाजार समितीकडून यात्रा बाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. खरसुंडी येथे दिनांक ०६ ते १४ या कालावधीत पौष जनावरांची यात्रा भरणार होती. परंतु जिल्ह्यामध्ये अजूनही लम्पी रोगाचा प्रादुर्भाव असल्याने याचा फैलाव होवू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे दिनांक ६ ते १४ यादिवशी भरणारा जनावरांचा बाजार रद्द करण्यात आला आहे.

तर दिनांक ०६ रोजी शुक्रवार पासून शेळ्या-मेंढ्याचा बाजार हा बाजार समितीच्या खरसुंडी येथील आवारात भरविण्यात येणार असून याची नोंद सर्व शेतकरी, व्यापारी, दलाल यांनी घ्यावी असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.