Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शुक्रवार ६ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 906

मेष:-
रागावर नियंत्रण ठेवावे. आवडी-निवडीसाठी खर्च कराल. कामावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल.

 

वृषभ:-
व्यापारात काही नवीन सुविधा कराल. आपले मानसिक आरोग्य जपावे. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. अतिविचार करू नये. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल.

Manganga

 

मिथुन:-
काही चांगले बदल अनुभवास येतील. आपणहून कोणत्याही गोष्टीत अडकू नका. मन प्रसन्न राहील. आपल्या कामात हुशारी दाखवावी. दिवसाच्या सुरूवातीस काही लाभ होतील.

 

कर्क:-
टीकेकडे फार लक्ष देऊ नये. जुने आजार दुर्लक्षित करू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. दिवसभर आत्ममग्न राहाल.

 

सिंह:-
छुप्या शत्रूपासून सावध राहावे. स्वत:वरुन इतरांची परीक्षा करा. अनोळखी लोकांशी व्यवहार करू नयेत. अपेक्षित उत्तराची वाट पहाल. संमिश्र घटनांचा दिवस.

 

कन्या:-
स्वत:साठी थोडा वेळ काढावा. आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल.

 

तूळ:-
डोकेदुखीचा त्रास संभवतो. घरात सामंजस्याने वागावे लागेल. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात.

 

वृश्चिक:-
वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. भागीदारीत नवीन संधी प्राप्त होतील. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्या. रखडलेल्या गोष्टी पुन्हा चालू होतील. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल.

 

धनू:-
परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. आहाराचे पथ्य न चुकता पाळा. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल.

 

मकर:-
प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून मदत मिळेल.

 

कुंभ:-
काही गोष्टींचे चिंतन करावे. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात. जुगारातून लाभ संभवतो. बोलतांना सारासार विचार करावा.

 

मीन:-
अतिघाई करू नये. घरातील वातावरण खेळकर राहील. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात. कामात गोंधळ उडवून घेऊ नका.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!