मुंबई: मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उर्फीला विरोध नाही, पण तिचा जो नंगानाच सुरु आहे, त्याला विरोध आहे, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.
चित्रा वाघ म्हणाल्या, “एक बाई भरदिवसा रस्त्यावर उघडी फिरते, नगण्य कपडे घालून अंगप्रदर्शन किती योग्य? मुंबईच्या भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उर्फी नावाची एक महिला नंगा नाच करत आहे. एक महिला मला सतत मेसेज करत होती मला बोलायचे आहे. एक दिवस मला त्या महिलेने एक व्हिडिओ पाठवला. एक मुलगी अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचे प्रदर्शन करताना दिसली. ज्या महिलेने मला व्हिडिओ पाठवला तिच्याशी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या माझी मुलगी याला बळी पडली आहे. त्याचमुळे मी भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराज यांच्या राज्यात असा नंगा नाच चालू देणार नाही, असा इशारा यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी उर्फीला दिला.

दरम्यान, कुणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असे महिला आयोग म्हणतंय. महिला आयोग म्हणत अशासाठी वेळ घालवणार नाही, महिला आयोगाला जाब विचारायचा नाही मग काय करायचे? केसेस सोडवणे तुमचे काम आहे. अशा अश्लील व्हिडिओची दखल घेतली नाही मग आयोगाच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचाराला.