मुंबई: केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला नवीन वर्षाची भेट दिली आहे. केंद्र सरकारने राज्याला विविध योजनांसाठी 500 कोटींचा निधी दिला आहे. यामध्ये भांडवली खर्चासाठी ऊर्जा विभागाला 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात महानिर्मिती व महापारेषणला 250 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे.
खालीलप्रमाणे होणार 250 कोटींचे वितरण
तिर्थपुरी जीआयएस सब स्टेशन आठ कोटी 93 लाख
पनवेल जीआयएस 25 कोटी
शहा सब स्टेशन 12 कोटी 29 लाख
धानोरा सब स्टेशन 8 कोटी 78 लाख
साखरी सौर प्रकल्पाला 30 कोटी
दोंडाएचा सौर प्रकल्पाला 70 कोटी
पावणे जीआयएस सब स्टेशन 21 कोटी
मानकोली जीआयएस सब स्टेशन 16 कोटी चार लाख
ईरइ डॅम सौर प्रकल्पास 30 कोटी
उलवे नोड जीआयएस सब स्टेशन 27 कोटी 39 लाख

दरम्यान, केंद्र सरकारने राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेतंर्गत 50 वर्ष बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार, राज्याला 500 कोटी मंजूर करण्यात आले आहे.