नवी दिल्ली : 2023 मधील अर्थसंकल्प आता लवकरच येत आहेत यापूर्वीच मोदी सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांना कर भरावा लागणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, केंद्र सरकारने प्राप्तिकर रिटर्न भरण्याच्या अर्जात मोठा बदल केला आहे. केंद्र सरकाने स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठांना मोठी भेट दिली आहे. त्यानुसार आता 75 वर्षांवरील नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरण्याची गरज नाही.
अर्थमंत्रालयाने ट्विट करुन दिलेल्या माहितीनुसार, देशातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यावर्षापासून इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे पेन्शन अथवा इतर योजना याशिवाय उत्पन्नाचा कोणतेही स्त्रोत नाही. त्यांना याचा फायदा होईल.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 मधील अर्थसंकल्पात याविषयीची घोषणा केली होती. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कर सूट देण्याची घोषणा त्यांनी केली होती.