अमरावती : २०१९ मध्ये देवेंद्र भुयार यांच्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यानंतर वाहन पेटवून दिले अशी तक्रार देवेंद्र भुयार यांच्या चालकानं पोलिसांत केली होती. आता आमदार भुयार यांच्या नार्को टेस्टची मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

खासदार अनिल बोंडे म्हणाले, निवडणुकीत केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी गाडी जाळपोळचा प्रकार झाला. गाडी जाळपोळचा प्रकार त्यांनी स्वतः घडवून आणला होता. लोकशाही प्रक्रियेला काळीमा फासणारा व्यक्ती विधानसभेत जाणे योग्य नाही. जनभावनेचा आदर करून या प्रकरणाची निश्चित चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली.
तसेच, “गाडी जाळपोळ प्रकरणी दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. असं वाटत असेल तर देवेंद्र भुयार यांनी स्वतःच पोलिसांसमोर जावं. आपली नार्को टेस्ट करून घ्यावी, गाडी जाळण्याचे प्रकरण देवेंद्र भुयार यांनीच रचलं होतं. ती सर्व नौटंकी ही सहानुभूती मिळवण्याची प्रक्रिया होती. असा गंभीर आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर लावला.