अकोला : योगी आदित्यनाथ हे आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावर योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्र लुटायला आले आहेत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला.
अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे-फडणवीस यांचं अनैतिक सरकार आलं तेव्हापासून गुजरात, उत्तरप्रदेशला येथे काम करायला स्कोप मिळालाय. राज्यपाल कोश्यारी मध्यंतरी म्हणाले होते, गुजराती, मारवाडी महाराष्ट्रात राहिले नाही, तर महाराष्ट्राला कोणी विचारणार नाही. आता उरलेल्या मराठी माणसांचा घास वेदांत, फॉक्सकॉननं पळविला. सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेले. गुजरातमध्ये भाजपला यश मिळालं. आता राहिली चित्रपट सृष्टी ती लुटायला योगी आदित्यनाथ आलेत, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

दरम्यान, गुजरातच्या लोकांनी आधी प्रकल्प नेले. ती सुरुवात होती. आता उत्तरार्ध उत्तर प्रदेश करत आहे. मुंबईतील सिनेसृष्टी उत्तर प्रदेशला नेण्याचा घाट योगी आदित्यनाथ यांच्याकडून चालविला जातोय, अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली