Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिले कार्यकर्त्यांना ‘हे’ धडे!

0 232

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यासोबत संवाद साधला आहे. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असतांना शरद पवार यांनी निवडणुकीच्या बाबतीत महत्वाचे विधान केले आहे.

 

यावेळी शरद पवार म्हणाले, “गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाहीत, बहुतांश ठिकाणी प्रशासकच हे सर्व कारभार पाहत आहे. निवडणुका जाहीर कधी होतील या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारी करत असतात, पण थेट मे महिन्यात निवडणुका होतील अशी माहिती शरद पवार यांनी पुण्याच्या बैठकीत दिली.

Manganga

 

दरम्यान, शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागा अशा सूचनाही दिल्या आहे. यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामाला लागा अशा सूचना दिल्या. तसेच, आज पुण्यातील पक्ष कार्यालयात शरद पवार यांच्यासह जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, गट आणि गण नेते यांच्यात संवाद बैठक पार पडली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!