मुंबई: सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात ‘पोस्टयुद्ध’ सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी या वादावरून थेट चित्रा वाघ यांना लक्ष्य केलं आहे.
विद्या चव्हाण म्हणाल्या, “उर्फी की बर्फी कोण काय घालते यात मला काही रस नाही. चित्रा वाघ यांनी कितीही आरडाओरडा केला तरी मुली अशा प्रकारे फिरणं थांबवणार नाहीत. आता लोकांनीच ठरवायला हवं की कोणी कसे आणि किती कपडे घालावेत. हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, असं चव्हाण म्हणाल्या.

दरम्यान, ज्या चित्रा वाघ उर्फी जावेदचा थोबाड फोडण्याच्या वल्गना करतात, त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते काही कारवाई करणार की नाही, असा सवालही विद्या चव्हाण यांनी केला आहे.