मुंबई : रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या मतदारसंघात शैक्षणिक कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना मुख्यमंत्र्यांवर तसेच शिंदे गटावर टीका केली आहे.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, नवीन वर्षाची सुरवात चांगल्या कामाने झालीय. सिनेट ठिक आहे. पण, आम्ही म्हणतो विधानसभेच्या निवडणुका घ्या. महापालिकेच्याही निवडणुका घ्या. त्यांची निवडणुका घेण्याची हिंमत नाही म्हणून हे सर्व सुरू असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले. 40 गद्दार आमदार, 13 खासदार आणि महापालिका निवडणुका घेऊन दाखवा, असं आव्हानंच आदित्य ठाकरे यांनी दिलं.

तसेच ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याच्या विकासासाठी बाहेर जात नाहीत. इतर राज्याचे मुख्यमंत्री पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आपले मुख्यमंत्री मात्र, दिल्लीला जाऊन बसतात, इतर राज्याचे मुख्यमंत्री आपआपल्या राज्यांचा विचार करतात. पण, आपले मुख्यमंत्री फक्त स्वतःचा विचार करतात, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.