मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आधीच विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. आता त्यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध सुरु आहे, असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केला आहे. ऋता आव्हाड यांनी नुकतेच एक ट्विट केले.
ऋता आव्हाड ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रिदा राशीद यांनी विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर 354 कलमाअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता त्यानंतर 376 अर्थात बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिला तयार करण्याचा घाट घातला जातोय, असे त्या म्हणाल्या.
मला आत्ताच सूत्रांकडून कळलं की 354 नंतर, 376 ( बलात्कार) चा आरोप करण्यासाठी महीला तयार करण्याचा घाट घातला जात आहे.
खात्रीलायक व्यक्तिने हे सांगितलं आहे. @Dev_Fadnavis— Ruta Samant (@RutaSamant) January 5, 2023
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून याबद्दल ऋता आव्हाड यांनी विचारणा केली आहे.