सिंधुदुर्गः विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काल संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात नितेश राणेंबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी टिल्लू असा शब्द वापरला. यावरून नितेश राणे यांनी पलटवार केला.
नितेश राणे म्हणाले, याच टिल्लूने सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत तुम्हाला कसा घाम फोडला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. काल अजित पवारांची चिडचिड बघितली. त्यामुळे आमची टीका योग्य ठिकाणी झाली आहे, असे नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, गूगलला धरणवीर असं सर्च केलं तर नाव अजित पवारच येणार, आम्ही सोडलेला बाण योग्य जागीच जाऊन लागलाय, तसेच, यांच्याच महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रतापगड,विशाळगडवर अनधिकृत बांधकाम झालं ते तोडण्याची हिंमत झाली नाही, अशा शब्दात नितेश राणे यांनी सुनावलं.