रत्नागिरी: राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. राज्यातील गावपातळीपासून ते देशपातळीपर्यंतच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णयही झाला. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात एक अनोखीच महायुती जन्माला आली आहे.
माहितीनुसार, लांजा तालुक्यात खरेदी विक्री संघाची निवडणूक होत आहे. येत्या 15 जानेवारी रोजी ही निवडणूक होत आहे. 17 जागांसाठी मतदान होत असून एकूण 37 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ही एक छोटी निवडणूक असली तरी ती जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. खरेदी विक्री संघावर आपला वरचष्मा राहावा म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आपली गणितं मांडली असून त्यानुसार काम करत आहेत.
दरम्यान, या निवडणुकीत भाजप, शिंदे गट विरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा सामना होईल अशी अपेक्षा होती. लांज्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र आले आहेत. तर उद्धव ठाकरे यांचा गट स्वबळावर लढणार आहे.